बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली | जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार तीन पैकी एक महिला लैंगिक अत्याचाराला सामोरे जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने महिलांवरील अत्याचारावर अभ्यास केला असून त्या अभ्यासातून स्त्रियांना मोठ्या प्रमाणात लैंगिक आणि आपल्या जोडीदाराकडून शारीरिक हिंसेचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जागतिक पातळीवर केलेल्या एका अभ्यासावरून डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल सादर करून एखाद्या महिलेच्या जोडीदाराकडूनच तिच्यावर अत्याचार होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2010 ते 2018 दरम्यान या विषयावर अभ्यास करून अहवाल दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 2010 ते 2018 या काळातील लैंगिक आणि शारीरिक हिंसाचाराच्या घटनांचा अभ्यास केलेला असून त्यामध्ये कोरोना काळातील घरगुती हिंसाचाराच्या घटनांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनाकाळात लॉकडाउन केल्यामुळे सर्व लोक एकाच घरात बंदिस्त झाले आणि त्यामुळे घरगुती हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या.

2020 या वर्षात कोरोना बरोबरच घरगुती हिंसाचार तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून महिला आणि लाखो कुटुंबांवर त्याचा परिणाम झाला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर टेड्रोस अधनाॅम घेब्रेसस यांनी सांगितलं आहे. जागतिक पातळीवर केलेल्या या अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की, जागतिक पातळीवर तीन पैकी एक महिला अशी आहे तिला शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावं लागतं.

थोडक्यात बातम्या

देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!

‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण

दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून 60 वर्षांचे आजोबा चढले विजेच्या खांबावर, अन्…

भर रस्त्यात माथेफिरुचा चौघांवर चाकू हल्ला; एका व्यक्तीचा मृत्यु, तीन जण गंभीर जखमी

सचिन वाझेंची उचलबांगडी होणार; अनिल देशमुखांनी केली मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More