आरोग्य कोरोना देश

कोरोना काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं -राहुल गांधी

दिल्ली | संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसतोय. दिवसागणिक रूग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे अशा वेळी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. म्हणून यूजीसीनेही विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या पाहिजेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणतात, “कोरोनाने अनेकांचं नुकसान झालं आहे. अशात विद्यार्थ्यांचंही नुकसान झालंय कारण परीक्षा रद्द झाल्या आहेत. मात्र सध्या अशा वातावरणात परीक्षा घेणं योग्य नाही. यूजीसीने फार गोंधळ घातला आहे. त्यामुळे  कोणताही गोंधळ न करता वर्षभरात ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालानुसार विद्यार्थ्यांना पास करावं.”

दोन दिवसांपूर्वीच यूजीसीद्वारे आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत दिलेल्या निर्देशांचं पालन करत परीक्षा घ्यायला हरकत नाही असं म्हटलं होतं. एवढंच नाही तर गुरुवारी यूजीसीने परीक्षांची कार्यपद्धतीही जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. मात्र याला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करणं हाच पर्याय योग्य आहे असल्याचं महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक व्हिडीओ!; विकास दुबेचा एन्काऊंटर होण्याआधी मीडियाच्या गाड्या अडवल्या

विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“बाळासाहेबांनी एक शरद बाकी गारद शीर्षकाने अग्रलेख लिहिला होता, तुमचा अभ्यास पक्का करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या