Eye care | आजकाल लहान असो किंवा मोठे व्यक्ती प्रत्येकाच्या हातात आता मोबाइल दिसून येतो. तसेच कंपनीमध्ये किंवा इतर ठिकाणी देखील लॅपटॉपवर तासन-तास काम करावे लागते. जास्त वेळ स्क्रीनसमोर राहिल्याने त्याचे डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होतात. बऱ्याच जणांचा चष्म्याचा नंबर देखील यामुळे वाढतो किंवा मग कुणाला लहानपणीच चष्मा लागतो.
आता काम करायचे म्हटल्यावर लॅपटॉपशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये बऱ्याचदा डोळ्यांना खुप जळजळ होते. अशावेळी बरेच जण आय ड्रॉपचा वापर करतात. मात्र, तुम्ही काही (Eye care) घरगुती उपाय करूनही या समस्येपासून आराम मिळवू शकता. या लेखात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा
गुलाबपाणी : मुख्यतः त्वचेच्या (Eye care) काळजीसाठी वापरले जाणारे गुलाबजल हे तुमच्या डोळ्यांसाठी देखील खूप प्रभावी आहे. त्याचा वापर डोळ्यांना ताजेतवाने आणि हायड्रेट करण्यास आणि कोरडेपण कमी करण्यास मदत करतो. तुम्ही ते आय ड्रॉप प्रमाणे वापरू शकता. त्यातील नॅच्युरल एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म ओलावा वाढविण्यास मदत करतात.
काकडी : पाण्याने समृद्ध काकडी देखील तुमच्या डोळ्यांना ओलावा प्रदान करण्यास मदत करू शकते. काकडी त्याच्या थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्यामुळे काकडीचे काप बंद डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते आणि डोळ्यांना आराम मिळतो. त्यातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट गुणधर्म (Eye care) आणि उच्च पाण्याचे प्रमाण डोळ्यांना हायड्रेट करण्यास, सूज कमी करण्यास मदत करते.
शुद्ध तूप : शुद्ध गाईचे तूप डोळे कोरडे होण्याच्या समस्यांपासून आराम देऊ शकते. यासाठी झोपण्यापूर्वी पापण्यांभोवती थोडेसे तूप लावावे. तूप ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे जळजळ देखील कमी होते.
अॅलोवेरा जेल : त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांवर उपाय म्हणून देखील अॅलोवेरा जेलचा वापर केला जातो. तसेच ड्राय आय सिंड्रोममध्ये देखील कोरफड प्रभावी आहे. मॉइश्चरायझिंग आणि (Eye care) अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे कोरफड जेल डोळ्याभोवती लावल्यास डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो. कोरफड त्वचेला हायड्रेट करण्यास, जळजळ कमी करण्यास मदत करते.
News Title : Eye care tips
महत्त्वाच्या बातम्या-
सोन्याने घेतली पुन्हा भरारी, काय आहेत आजचे दर?
वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर; मुख्य आरोपीला पोलिसांनी..
अखेर वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
खरेदीची करा घाई! Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर मिळतंय तगडं डिस्काऊंट
“..तर राज्यात तिसरी आघाडी निश्चित”; बच्चू कडू यांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत