“24 तासांत मी 100 पुरुषांसोबत…”, 23 वर्षीय प्रसिद्ध माॅडेलच्या वक्तव्याने खळबळ!

ezra vandan

Ezra Vandan | ओन्ली फॅन्स फेम (OnlyFans Fame) प्रसिद्ध मॉडेल एज्रा वंदन (Ezra Vandan), जिला अजरा अय वंदन  म्हणूनही ओळखले जाते, ही एक तुर्की ओन्ली फॅन्स मॉडेल आहे. पण, सध्या ती मोठ्या अडचणीत सापडली असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. मॉडेलच्या अडचणी वाढण्यासाठी तिने केलेले एक वक्तव्यच कारणीभूत ठरले आहे.

एज्रा वंदनने (Ezra Vandan) 24 तासांत 100 पुरुषांसोबत झोपण्याच्या प्लॅनची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, एज्रा वंदनच्या जाहीर घोषणेनंतर पोलीस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी तुर्कीची राजधानी इस्तंबूलमधून एज्रा वंदनला अटक केली.

एज्रा वंदनला अटक?

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, लोकप्रिय मॉडेलला अटक केल्यानंतर, तुर्की पोलिसांनी सांगितले की, मॉडेलच्या योजना अश्लील आणि तुर्कीच्या नैतिक मानकांसाठी धोकादायक होत्या. त्यामुळे तिला तात्काळ अटक करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ezra Vandan (@acnoctem)

एज्रा वंदनची वादग्रस्त घोषणा-

23 वर्षीय मॉडेल एज्रा वंदनने 14 जानेवारी रोजी सोशल -मीडियावर आपल्या इच्छा जाहीर केल्या. तिने सांगितले की, तिला इतक्या मोठ्या प्रमाणात सेक्स करायचा आहे की, ती पहिला तुर्की रेकॉर्ड आणि जागतिक रेकॉर्ड दोन्ही मोडू शकेल. “माझे ध्येय सर्वात आधी तुर्कीचा विक्रम मोडणे आहे, नंतर जागतिक विक्रम!” असे तिने म्हटले. आपल्या इच्छा जाहीर करताना, तिने लाल रंगाची अंतर्वस्त्रे परिधान केलेला एक बोल्ड फोटोही शेअर केला होता. त्यासोबतच तिने “मी 24 तासांत 100 पुरुषांपासून सुरुवात करत आहे,” असेही म्हटले होते.

अटकेचा व्हिडिओ व्हायरल-

तिच्या घोषणेनंतर, इस्तंबूल सुरक्षा शाखा संचालनालयाच्या नैतिकता ब्युरोने तिच्या वक्तव्याची ताबडतोब दखल घेतली आणि चौकशी सुरू केली. ज्यानंतर त्यांनी मॉडेलला अटक केली. तिला अताशेहिर रुग्णालयातून अटक करण्यात आली, जिथे ती कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी गेली होती. तिच्या अटकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

ज्यामध्ये एज्रा वंदन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत होती आणि दोन महिला अधिकारी तिला मनगट पाठीमागे बांधून घेऊन जात होत्या. त्यावेळी ती जीन्स आणि क्रॉप टॉपमध्ये दिसली. “सार्वजनिक सभ्यतेच्या विरुद्ध जाणाऱ्या तिच्या कृत्यांसाठी तिला अटक करण्यात आली,” असे तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितले आणि अशा कृत्यांसाठी देशाच्या कायदेशीर परिणामांवर प्रकाश टाकला.

एज्रा वंदन कोण आहे?

बहुसंख्य मुस्लिम देश असलेल्या तुर्कीने 2023 मध्ये ओन्लीफॅन्सवर बंदी घातली होती. पण, बंदी असूनही अनेक युजर्स कंटेंट अपलोड करत होते. उत्तेजक पोस्ट आणि लैंगिक दाव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या एज्रा वंदनला तुर्कीमध्ये लोकप्रियता मिळाली आणि तिचे ओन्लीफॅन्स अकाउंट सुरू केल्यानंतर तिने 4,16,000 इंस्टाग्राम फॉलोअर्स देखील मिळवले. याव्यतिरिक्त, ओन्लीफॅन्सच्या निर्मात्या बोनी ब्लू यांच्याकडे एका दिवसात 1,057 पुरुषांसोबत झोपण्याचा विक्रम आहे.

News Title : Ezra Vandan to sleep with 100 men in 24 hours

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .