तंत्रज्ञान

फेसबुकवर दिवसाला ३ लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी

मुंबई | फेसबुकने कॉन्फेटी हा इंटरॅक्टीव्ह गेम भारतात सुरु करण्याचं ठरवलं आहे. याद्वारे दिवसाला 3 लाख रूपये जिंकण्याची संधी भारतीयांना मिळणार आहे.

आज हा गेम प्रदर्शित करण्यात आला आहे. बुधवार ते रविवार फेसबुकच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर हा खेळवण्यात येईल.

या गेममध्ये विविध प्रश्न विचारले जातील. त्यातल्या विजेत्यांना ३ लाख रुपये जिंकण्याची संधी असेल.

हा गेम सर्वात आधी अमेरिकेत सुरु झाला होता. त्यानंतर तो इंग्लंड, कॅनडा, मेक्सिको, थायलंड, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स या देशातही सुरु झाला.

दरम्यान, कॉन्फेटी हा गेम संपूर्णतः भारतीय असेल, असा प्रयत्न केल्याचं फेसबुक इंडियाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मूर्ख बनवू शकत नाही; डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर चिडले

-“गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार”

-रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली ‘ही’ ऑफर

-ओबीसी आरक्षणासंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता

-जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी ऑफर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या