तंत्रज्ञान

युझर्सच्या डोक्याला टेन्शन; भारतासह जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन!

 नवी दिल्ली | जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम गुरुवारी दुपारपासून डाऊन झाल्यामुळं युझर्सना अडचणीचा सामना करावा लागत आहे. भारतातही अनेक युझर्सने फेसबुक डाऊन असल्यामुळे काही फीचर्स काम करत नसल्याची तक्रार केली आहे.

मार्क झुकेरबर्गच्या मालकीचं असलेलं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन झालं आहे. जगभरातील करोडो लोकांना सध्या याचा अनुभव येत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर लोकांना फोटो पाठवता येत नाहीत. तसेच फोटो डाऊनलोडसुद्धा करता येत नाहीत.

Down Detector च्या मते ब्रिटनसह डेन्मार्क, जर्मनी, हंगेरी, स्पेन, फ्रान्स, आणि पोलंडमध्येही याच समस्येचा सामना करावा लागला. फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन होण्यामागचं कारण नेमकं काय होतं, ते अजूनही समोर आलेलं नाही. यापूर्वीही अनेकदा याच समस्येला सामोरं जावं लागलं होत.

दरम्यान, एकाच कंपनीचे असलेल्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर लोकांना अडचणी येत आहेत, मात्र याप्रकरणी फेसबुककडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या