बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! फेसबुकचं नाव बदललं

मुंबई | प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या नव्या पर्वाला आता सुरूवात झाली आहे आणि याची सुरूवात कंपनीच्या नावात बदल करून करण्यात आली आहे. फेसबुक कंपनी आपलं नाव बदलणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होती. अखेर फेसबुक कंपनीने गुरूवारी रात्री आपलं नाव बदललं असल्याची घोषणा केली. कंपनीने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सगळ्यांचं आवडतं फेसबुक आता ‘मेटा’ या नावाने ओळखलं जाणार आहे. मेटा हे फेेसबुक कंपनीचं नवं नाव असुन ते मेटावर्स तयार करण्यास मदत करणार आहे. मेटावर्स अशी जागा आहे जिथे आपण 3D मध्ये खेळु आणि कनेक्ट करू शकत असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. तर मेटा हे सोशल कनेक्शनचं पुढचं पर्व असल्याचंही फेसबुक अर्थात मेटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

सोशल कनेक्शनचा नवा मार्ग असणारा मेटा एक सामूहिक प्रोजेक्ट आहे. जो जगभरातील लोकांद्वारे तयार केला जाईल आणि प्रत्येकासाठी खुला असेल. मेटामुळे आजच्या शक्यतेच्या पलीकडे जाणाऱ्या मार्गांनी आपण सोशलाईज करण्यासाठी आणि खेळण्यासाठीही सक्षम असणार असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. येत्या काळात आम्ही अधिक उत्तम प्रकारे स्वत:ला सादर करू असा विश्वास कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दाखवला आहे.

फेसबुकने बनवलेल्या बाकी अॅप्स अर्थात मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इंन्स्टाग्रामचं नाव बदलत नसल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय कंपनीने त्यांची कॉर्पोरेट रचना बदलली नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणं आणि त्यातून नवी अर्थव्यवस्था उभारण्याचा कंपनीचा मानस असल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“मला कधी कधी वाटतं मोदी आणि गडकरी यांच्यात स्पर्धा सुरू आहे”

‘…म्हणजे निश्चितच काहीतरी काळंबेर आहे’; नवाब मलिक आक्रमक

केंद्राकडून राज्यांना जीएसटी निधी जारी; महाराष्ट्राला मिळाले ‘इतके’ हजार कोटी

सब्यसाची यांच्या मंगळसूत्राच्या नवीन जाहिरातीवरून वाद; नेटकरी संतापले

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More