धक्कादायक…! 5 कोटी फेसबुक खात्यांवर सायबर हल्ला

नवी दिल्ली | 5 कोटी फेसबुक खात्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फेसबुकने यासंदर्भात खुलासा केला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याचं कळतंय. 

हॅकर्सनी फेसबुकच्या View as फीचरच्या कोडवर अटॅक केला आणि प्रोफाईल टेक ओव्हर केले, त्यामुळे त्यांना पासवर्डची गरज पडली नाही. गुरुवारी रात्री फेसबुकने यावर नियंत्रण मिळवलं. 

दरम्यान, हॅकर्स कोण होते? त्यांनी फेसबुक युझर्सचा डाटा चोरला की नाही? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक?

-भारतच आशियाचा चॅम्पियन; बांगलादेशला नागीन डान्स करण्याची संधीच दिली नाही

-धक्कादायक! पोलिओच्या लसीतच आढळले व्हायरस; महाराष्ट्रात हायअलर्ट

-तारिक भाई, इस बार आपने दिल तोड दिया- सुप्रिया सुळे

-भारतामुळे मला सलग 6 रात्री झोप लागली नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराची कबुली

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या