नवी दिल्ली | एक काळ असा होता, जेव्हा लोक एकमेकांना जाऊन प्रत्यक्ष भेटायचे. पण आजच्या डिजिटल युगात लोक एकमेकांना सोशल मीडियावर भेटत आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी फेसबुकने कर्मचाऱ्यांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. याआधी गुगलनेही घरून काम करण्याचा कालावधी पुढच्या वर्षांपर्यंत वाढवला आहे.
आरोग्य तज्ञ आणि सरकारी तज्ज्ञांच्या सल्ल्याने तसेच कंपनीत झालेल्या चर्चेतून एक निर्णय घेण्यात आला. फेसबुक कर्मचाऱ्यांना आता २०२१ वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरी बसून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे, त्याचबरोबर त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना १,००० डॉलर देण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे प्रवक्ते ननेका नॉर्विल यांनी दिली.
एक अहवालानुसार, फेसबुकमधील ४८,००० कर्मचारी या वर्षाच्या मार्च महिन्यापासून घरूनच काम करत आहे. कंपनीने आधी २०२० वर्षाच्या अखेरपर्यंत घरून काम करण्याची घोषणा केली होती. पण आता गुरुवारी घेतलेल्या नव्या निर्णयानुसार कंपनीने ही मुदत आता पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत वाढवली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, फेसबुक कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग मे महिन्यात म्हणाले होते की,”कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची परवानगी देऊ शकते, पण त्यात एक अट आहे. ऑफिसमध्ये काम करण्याऐवजी घरून काम केल्यावर याचा परिणाम त्यांच्या वेतनावर होऊ शकतो.” मार्चमध्ये The Verge ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना झुकरबर्ग म्हणाले,”पुढील ५-१० वर्षात कंपनी अर्ध्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची संधी देऊ शकते.”
महत्त्वाच्या बातम्या-
देशात कोरोनाने रेकॉर्ड मोडला, काल एकाच दिवसात मिळाले तब्बल एवढे हजार रूग्ण
दुकान कामगार, भाजीविक्रेते यांच्याही कोरोना चाचण्या करा; केंद्र सरकारचे निर्देश
लॉकडाऊनमध्ये सोनू सूद आणि चंदीगडच्या नीतीने ९० हजार मजुरांना पोहोचवले घरी…
Comments are closed.