बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शमीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांविरोधात फेसबूकची मोठी कारवाई

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयाची परंपरा अखेर पाकिस्तानने 24 ऑक्टोबर रोजी खंडीत केली. भारताने दिलेल्या 152 धावांचं लक्ष्य पाकिस्तानने 10 गडी राखून पूर्ण केलं. या सामन्यात एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र सोशल मीडियावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला नेटकऱ्यांनी निशाण्यावर धरलं आणि ट्रोलिंग करायला सुरूवात केली. यावेळी शमीला अनेक लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर शमीला ट्रोलिंग करणाऱ्या नेटकऱ्यांविरोधात फेसबुकने मोठी कारवाई देखील केली आहे.

भारतीय क्रिकेटपटूवर  केलेल्या चूकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स काढून टाकण्यास सुरूवात केली आहे. ती कारवाई तात्काळ आम्ही सुरू केली आहे. समाजात उपद्रव्य निर्माण करणाऱ्या आणि सामुदायिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आम्ही कारवाई यापूढेही करत राहू, असा इशारा फेसबूकच्या प्रवक्त्यांनी दिला आहे. मोहम्मद शमीने या सामन्यात 3.5 षटकात तब्बल 43 धावा देऊन सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे त्याला सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात आलं होतं.

मोहम्मद शमीला देशातील खेळाडूंनी आणि इतर नेत्यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. मोहम्मद शमी आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, या लोकांच्या मनात प्रचंड राग आहे कारण त्यांना कोणी प्रेम देत नाही. त्यांना माफ कर, असं काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, मोहम्मद शमीला ऑनलाईन लक्ष्य करणे धोकादायक आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत. तो चॅम्पियन आहे, आणि जो कोणी भारताची टोपी डोक्यावर चढवतो. त्याच्या ह्यदयात ऑनलाईन उपद्रवीपेक्षा जास्त भारत असतो. मी तुझ्यासोबत आहे शमी. पूढील सामन्यात त्यांना चांगली खेळी करून उत्तर दे, असं भारताचा धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवागने ट्विट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

“इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More