आता फेसबुकवरही भरणार बाजार, OLX ला मोठा झटका

मुंबई | फेसबुक युजर्ससाठी मार्केट प्लेस नावाचं नवीन फिचर तयार करण्यात आलंय या फिचरच्या माध्यमातून युजर्स सामानाची खरेदी आणि विक्री करू शकणार आहेत.

मुंबई-पुणेसारख्या मेट्रोसिटींमध्ये या फिचरची चाचणी करण्यात आलीय. मुंबईत या फिचरला चांगला प्रतिसाद असल्यानं संपूर्ण देशभरात हे फिचर लॉन्च करण्यात येणार आहे.

मार्केट प्लेस हे फिचर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडसह 17 देशांमध्ये लॉन्च करण्यात आलंय. अमेरिका आणि अन्य 25 देशांमध्ये हे फिचर आधीपासूनच कार्यरत आहे.

फेसबुक प्रोफाईलवर फ्रेण्ड रिक्वेस्ट आणि नोटिफिकेशन याच्यामध्ये हे फिचर आहे. तिथं खरेदीबरोबर स्वतःच्या विक्रीयोग्य वस्तूही अपलोड करता येणार आहे.