बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेसबुक, मेसेंजरसह व्हॅाट्सअपची सेवा काही काळासाठी ठप्प

मुंबई | प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म असलेल्या फेसबुकसह त्याच्याशी संलग्न असलेल्या मेसेंजर आणि व्हाॅटसअपची सेवा जगभरात काही काळासाठी ठप्प झाली होती. तिन्ही प्लॅटफाॅर्मवर यूझर्सना अडचणी येत होत्या मात्र काही काळातच या सेवा सुरळीत करण्यात फेसबुकला यश आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सर्वात आधी व्हाॅटसअप डाऊन झाल्याचं समोर आलं. यामध्ये यूझर्सला मेसेज पाठवताना, फोटो पाठवताना तसेच फोटो डाऊनलोड करताना अडचणी येत होत्या. तसेच जीआयएफ किंवा स्टीकरही जात नव्हते. दुसरीकडे मेसेंजरवरही मेसेज जात नसल्याचं पहायला मिळालं.

फेसबुकही डाऊन झाल्याचं पहायला मिळालं त्यामुळे यासंदर्भात बोलण्यासाठी यूजर्सनी नेहमीप्रमाणे ट्विटरचा सहारा घेतलेला दिसला. ट्विटरवर व्हाॅटसअप डाऊन आणि फेसबुक डाऊन अशाप्रकारे दोन हॅशटॅग ट्रेंड होताना पहायला मिळाले. यूजर्सनी नाराजी तर व्यक्त केलीच मात्र फेसबुक आणि संबंधित सेवांची मिम्सद्वारे खिल्ली देखील उडवलेली पहायला मिळाली.

दरम्यान, काही काळानंतर सेवा पूर्ववत होताच पुन्हा या तिन्ही सेवांचे फीचर्स चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं दिसलं, मात्र काही काळ झालेल्या या गैरसोईनं अनेकजण अस्वस्थ झाल्याचं देखील पहायला मिळालं.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More