उद्योगपती मुकेश अंबानींच्या ‘त्या’ टीकेला फेसबुकचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली : डेटा काही तेल नाही. भारताने इतर डेटा देशातच रोखण्याशिवाय इतर देशातही मुक्तपणे त्याचा प्रवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे, असं प्रत्युत्तर फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेय यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना दिले.

डेटा हे तेलाप्रमाणे आहे. त्याचा वापर आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी भारतीयांकडे असले पाहिजे असं काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींनी म्हटंल होतं.

भारत आणि संपूर्ण जगभरातील अशी काही लोक आहेत, ती डेटाला तेल समजतात. त्यांच्या मते अशा तेलाचे म्हणजेच डेटाचे देशाच्या सीमेपर्यंत राखून ठेवल्यास समृद्धी होईल. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे, अशा प्रकारे निक क्लेग यांनी प्रत्युत्तर  दिलं आहे.

सद्यस्थितीत डाटा कंपनींची विशेष रुप हे विदेशी कंपन्यांकडे आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी ही परदेशी कंपन्यांकडे नसावा, असं वक्तव्य मुकेश अंबानीने केलें होतं.

महत्वाच्या बातम्या-