सिडनी | ऑस्ट्रेलियात लागू केलेल्या नव्या मीडिया कायद्याच्या विरोधात फेसबुकने आपल्या माध्यमातून बातम्या दाखवणं बंद केलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नवीन मीडिया कायदा लागू करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरससंबंधी माहिती, सरकारी कार्यालय यांचं अधिकृत पेज किंवा इतर कोणत्याही बातम्या प्रसारित करणाऱ्या माध्यमांना आता फेसबुकने मज्जाव केला आहे. ऑस्ट्रेलियात मंत्र्यांनी सुंदर पिचाई आणि मार्क झुकरबर्ग यांच्याशी नव्या मीडिया कायद्याविषयी चर्चेनंतर सुंदर पिचाई यांनी गूगल ऑस्ट्रेलियामध्ये बंद करण्याची धमकी दिल्याचंही समजतंय.
कायद्यानुसार आता फेसबुक किंवा गूगल सर्च इंजिनला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपनींना पैसे अदा करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आता फेसबुकने आक्रमक पवित्रा घेत बातम्यांचं प्रसारणच बंद केलं आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारकडून बातम्या वाचण्यासाठी संबंधित संकेतस्थळ किंवा अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून माहिती घेण्याचं आवाहन केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण
आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, राजेश टोपे म्हणाले…
लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ
राज्य सरकारच्या सेवेतील सर्वच दर्जाच्या पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार?
‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस