बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेसबुकचा डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; केली ही मोठी कारवाई

वॉशिंग्टन | अमेरिकेच्या संसद परिसरात दंगल भडकावण्याच्या आरोपाखाली फेसबुकने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई केली. फेसबुकने ट्रम्प यांचं अकाऊंट 2 वर्षांसाठी म्हणजेच 2023 पर्यंत निलंबित केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर याआधी जानेवारी महिन्यात अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली होती. फेसबुकने विद्यमान राष्ट्राध्यक्षाला बॅन करण्याची ती तेव्हा पहिलीच वेळ होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवरील 2 वर्षांची बंदी 7 जानेवारी 2021 पासून लागू होईल. या दिवशीच पहिल्यांदा त्यांच्या अकाऊंटचं निलंबन झालं होतं. ट्रम्प यांच्या कार्यकाळात फेसबुकने केलेली ही सर्वात कडक कारवाई होती.

ट्रम्प यांच्याकडून दंगलखोरांना तुम्ही माझ्यासाठी खास आहात, माझं तुमच्यावर प्रेम आहे, असं म्हणणं, त्यांना खरा देशभक्त म्हणणं आणि या दिवसाला इतिहासात लक्षात ठेवलं जाईल असं सांगणं फेसबुकच्या नियमांविरोधात आहे, असं फेसबुकने त्यावेळी म्हटलं. यानंतर फेसबुकने हे प्रकरण कंपनीच्या बोर्डाकडे सोपवलं होतं. यात वकील, मानवाधिकार कार्यकर्ते आणि अकॅडमिक्स यांचा समावेश आहे. या बोर्डाला ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवायची की कायम ठेवायची यावर निर्णय घ्यायचा होता. फेसबुकसाठी अनिश्चितकाळापर्यंत निलंबन करणं योग्य ठरणार नाही, असं बोर्डाने म्हटलं.

दरम्यान, एकीकडे फेसबुकनं ट्रम्प यांचं अकाऊंट बॅन केलं आहे, तर दुसरीकडे नायजेरियानं ट्विटरवर मोठी कारवाई केली आहे. या देशात ट्विटर अनिश्चित कालावधीसाठी सस्पेंड केलं गेलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

…तोपर्यंत कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही- अजित पवार

“एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं”

उलट्या काळजाचा किम जोंग उन! कोरोनाला रोखण्यासाठी दिला हा अंगावर काटा आणणारा आदेश

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

पुणे अनलॅाक होणार?; अजित पवार म्हणाले, सोमवारी निर्णय होणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More