मार्क झुकरबर्कलाच ‘फेसबुक’वरुन हटवण्याच्या हालचाली सुरु!

न्यूयॉर्क | फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गलाच आता फेसबुकच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. चार समभागधारकांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला आहे. 

फेसबुकवरुन झालेल्या डाटा चोरीचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यामुळे कंपनीवरील लोकांचा विश्वास कमी झाल्याचा या समभागधारकांचा आरोप आहे. 

इलियोनिस, रोड आयलँड, पेन्सिवेनिया आणि स्टेट ट्रेझरर्स अँड न्यूयॉर्क सिटी कंप्ट्रोलर स्कॉट स्ट्रिंगर यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. 2017 मध्ये सुद्धा झुकेरबर्गविरोधात असाच प्रस्ताव मांडला होता मात्र तो फेटाळण्यात आला. 

फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स झुकरबर्गकडेच आहेत. त्यामुळे असा प्रस्ताव मांडणाऱ्या समभागधारकांची डाळ शिजण्याची सुतराम शक्यता नाही असं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली, पोलिसांना अश्रू अनावर

-भाजपच्या गोपनीय सर्व्हेवर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

-मला कोणत्याही पदाची लालसा नाही, मी किंगमेकर आहे- पंकजा मुंडे

-लपून काय वार करता, समोरुन वार करा; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

-अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही?; हायकोर्टाचा सवाल