देशात डावे फक्त नावाला, तर काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात!

मुंबई | देशात डावे फक्त नावाला उरले आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्या त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. 

काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी काँग्रेसचीही खिल्ली उडवली. 

हा फक्त ट्रेलर आहे, आता कर्नाटकातही भाजपचंच सरकार येणार आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी होणार, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.