शिंदे सरकारच्या खातेवाटपाबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत संयुक्त युती करत सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटप कधी होणार आणि कोणाला कोणतं खातं मिळणार याची सर्वांनी उत्सुक्ता आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरात ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, आम्ही लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करु, या सर्व गडबडीत आम्हाला त्यासंबंधी बैठक घ्यायला वेळच मिळाला नाही. अलीकडेच आमची बहुमत चाचणी झाली. त्यानंतर आम्हाला घरी जाताच आलं नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे ठाण्याला गेले आहेत आणि मी नागपूरला आलो आहे. ज्यांनी आम्हाला निवडून दिले आहे, त्यांचे आभार मानले पाहिजेत ना? उदया – परवा आम्ही बसून सर्व ठरवू. फॉर्मुला ठरवू आणि आपल्याला कळवू.
भाजपकडे 100 पेक्षा जास्त आमदार आहेत तर शिंदे यांच्या गटात 40 आमदार आहेत. संख्याबळ जास्त असताना देखील भाजपच्या वाट्याला दुय्यम पद आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात आता नवीन खातेवाटपात काय होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. फडणवीसांच्या आधीच्या मंत्रीमंडळात शिवसेनेला 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रीपदे देण्यात आली होती.
एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 + 10 अपक्ष आमदार सध्या भाजपसोबत आघाडीत आहेत. दोनही पक्षात मंत्री होण्यासाठी आमदार उत्सुक आहेत. स्वपक्षीयांनी नाराज न करता शिंदे गटाला जास्त मंत्रीपदे देण्याचं आव्हान सध्या भाजपसमोर आहे. त्यामुळेच सरकारकडून मंत्रीमंडळ विस्तार लांबवला जातो आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
थोडक्यात बातम्या –
‘मिस इंडिया 2022’ ठरलेल्या सिनी शेट्टीबद्दल जाणून घ्या सर्व काही
पावसाळ्यात ‘या’ सोप्या घरगुती उपायांसोबत घ्या तुमच्या त्वेचेची काळजी
‘काय ती शायरी, काय ती अदाकारी…’, चित्रा वाघ यांचा राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला
‘काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आमदारांपाठोपाठ नगरसेवकही शिंदे गटात
Comments are closed.