बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पटोलेंनी स्वबळाची घोषणा केल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरे भरले आहे”

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बेधडक वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी नुकताच केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पटोले यांनी केलेल्या या आरोपावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरे भरले आहे. त्यांना जेवण आणि पाणी देखील जात नाही. यामुळेच पटोलेंवर पाळत ठेवण्यात आली. नानांनी केलेल्या आरोपावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी  लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर आणखीही काही गंभीर आरोप केले आहेत. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. आमच्या मित्र पक्षांचं काय प्लॅनिंग आहे, याबद्दल मला कल्पना नाही, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”

मोठी बातमी! चालू कार्यक्रमात अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका

“तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण…”

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

नितेश राणेंच्या जुळवून घेण्याच्या वक्तव्यावर शिवसेनेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More