महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाला फडणवीसांनी सुनावले खडेबोल

मुंबई | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकात भाजप नेते आणि लेखक जय भगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान मोदींसोबत केली होती. यामुळे सर्व स्तरातून टीका केली जात आहे. यावर विधानसभेेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लेखकाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

आपल्या लिखाणातून काय अर्थ निघू शकतो याचा विचार करूनच प्रत्येकाने लेखन केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांच्या मार्गाने आपली वाटचाल असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांना महाराजांच्या मार्गावर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना शाईस्तेखानाची बोटे छाटणाऱ्या शिवाजी महाराजांच्या रूपात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दाखवलं होतं. मात्र महाराजांचा अशाप्रकारे अवमान मराठा मावळे खपवून घेणार नाही, असं म्हणत भाजप नेते विनोद तावडे यांनी इशारा दिला आहे.

ठळक बातम्या-

राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने लढवली ‘ही’ नवी शक्कल!

सिंचन घोटाळ्यात मी आरोपी नाही- अजित पवार

“महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या