बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला; संजय राऊतांची खोचक टीका

नवी दिल्ली | महाराष्ट्रात सध्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये गृहसचिवांना बदल्यांच्या रॅकेट संदर्भात एक अहवाल सादर केला.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अहवालाची खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीला येताना गृह सचिवांकडे बॉम्ब घेऊन आले होते. पण तो लवंगी फटाका असून त्याला वातही नसल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आल्याचं कळलं, ते बरोबर कोणतातरी कागद घेऊन आल्याचंही ऐकायला मिळालं. पण त्या तथाकथित अहवालामध्ये काडीचाही दम नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्याबरोबरच तो अहवाल जाहीर करा, ते वाचल्यानंतर कळेल की सरकारला अडचणीत आणेल असं त्यामध्ये काहीही नाही.

गृहमंत्री अनिल देशमुख हेच राज्याचे गृहमंत्री राहतील असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. सरकारमध्ये काही ठिकाणी भोकं पडली असून माहिती देणारे अधिकारी कोण आहेत याचा शोध घ्यावा लागेल असं सांगून मुख्यमंत्री योग्य वेळी बाहेर आल्यानंतर तोफगोळे आणि बॉम्ब घेऊन फिरणाऱ्यांमध्ये काहीच दम नव्हता हे स्पष्ट होईल आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर बोलण्याची काहीच गरज नाही तसेच त्यात बोलण्यासारखं काही नाही असंही संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

खोकला झाला म्हणून डाॅक्टरांकडे गेल्यावर छातीत जे आढळलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

“कुणी ख्रिसमस तर कुणी रमजान साजरा करा, पण दुर्गा पुजेवरही बंधनं येता कामा नये”

“होय ती व्होल्वो गाडी माझीच, पण मी सचिन वाझेंना कधी पाहिलंच नाही, ना कधी भेटलो” – मनिष भतिजा

इंग्लंड विरुद्ध सामन्यात विक्रमी खेळीनंतर वडिलांच्या आठवणीत भावुक झाला कृणाल पांड्या, पाहा व्हिडिओ

पहिल्याच ODI सामन्यात इंग्लंड संघाचा धुव्वा उडवत प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्याची धमाकेदार खेळी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More