उद्धव ठाकरेंना फोन करून फडणवीसांनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!
मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी फोन करून रश्मी ठाकरेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्याचं कळतंय.
रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असून त्या मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं.
रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? अशी विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी सरकार जो निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितलं. त्यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असं बोललं जात आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यात लोकांची वाढती गर्दी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची संंख्याही झपाट्याने वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“तुमचे चेहरे पाहून जगात कोरोना नसल्याची खात्री पटली, मीही मास्क काढून बोलतो”
महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट; एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!
राहुल तेवतियाचा खतरनाक अंदाज, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ तुफान व्हायरल
अवघ्या 12 वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!
आयुष्याच्या संघर्षाला कंटाळला; पत्नी आणि दोन मुलांना संपवून लिहिली धक्कादायक सुसाईड नोट
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.