बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुसुमाग्रजांची कविता, बाळासाहेबांची आठवण अन् फडणवीसांनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन म्हणजे राज्यासाठी एक पर्वणीच ठरत आहे. विविध मुद्द्यांवर चर्चा करताना सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगत आहेत. कधी कविता, शायरी, मुशायरा, चारोळ्या, यांचा आधार घेत सभागृहात रंगत आणली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका करण्यासाठी कुसुमाग्रजांच्या कवितेचा आधार घेतला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यानं ते सध्या अधिवेशनाला उपस्थित नाहीत. अशा परिस्थितीत राज्यात चाललेल्या गोंधळावरून फडणवीस यांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही प्रचंड वेदना होत असतील. स्वातंत्र्यदेवीची विनवणी आज इतकी खरी ठरेल, याची कल्पनाही कुणी केली नसेल, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

कुसुमाग्रज सांगून गेले…किती परखड आहे बघा
सूर्यकुलाचा दिव्य वारसा
प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन
घुबडांचे व्रत करू नका

जनसेवेस्तव असे कचेरी,
ती डाकूंची नसे गुहा..
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका!
सत्ता तारक सुधा असे,
पण सुराही मादक सहज बने.
करीन मंदिरी,
मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका…

प्रकाश पेरा अपुल्या भवती,
दिवा दिव्याने पेटतसे…
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता,
शंखच पोकळ फुंकू नका. सरकारचे नेमके काय चालले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या कवितेनंतर सभागृहात जोरदार गोंधळ पहायला मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून होत असलेलं हे राजकारण महाराष्ट्राला शोभणारं नाही, अशी टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या 

मोठी बातमी! ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यात नाईट कर्फ्यू लागू

‘…अन्यथा आम्ही जशास तसं उत्तर देऊ’; एकनाथ शिंदे यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा

“खाली बसा… मी मंत्र्याशी बोलतोय तुम्ही काय मंत्री आहे का?”

मोठी बातमी! न्यायालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दणका, आता…

‘भारतात दररोज Omicron चे 1.8 लाख रूग्ण आढळतील’; तज्ज्ञांचा धक्कादायक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More