“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका शब्दानेही बोलत का नाहीत?”
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांच्या राजीनामा घेण्यात यावा असा निर्णय झाला आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. सीबीआय चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर गृहमंत्रीपद कोणाच्या पारड्यात पडणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर हे अपेक्षितच होतं की, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिल्याचं माध्यमांद्वारे समोर येत आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की, राजीनामा द्यायला उशीर झाला. आमची अशी अपेक्षा होती की, इतकी गंभीर आरोप झाल्यानंतर आणि रश्मी शुक्ला यांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख राजीनामा देतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा राजीनामा आधीच घ्यायला पाहिेजे होता परंतू त्यांना देखील न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी लागली, असं फडणवीस म्हणाले.
राजीनामा जरी झाला असला तरी मला कोडं पडलं आहे. महाराष्ट्रात इतक्या भयावह घटना झाल्या. मंत्र्यांपासून ते पोलिसांपर्यंत आरोप झाले तरी राज्याचे मुख्यमंत्री एका शब्दाने बोलत का नाहीत? त्यांनी आद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच हे मौन अस्वस्थ करणारं आहे. त्यांनी या सर्व प्रकारात प्रतिक्रिया द्यायला हवी. एवढे गंभीर आरोप मंत्र्यांवर असताना मुख्यमंत्री बोलत का नाही, असा माझा सवाल आहे, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय चौकशी करण्यात यावी असा विनंती अर्ज मंजुर केला. त्यानंतर आता अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येईल. मागील चाळीस दिवसात ठाकरे सरकारची ही दुसरी विकेट पडली आहे. याआधी वनमंत्री संजय राठोड यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्…”
उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही? ‘या’ बड्या नेत्यानं उपस्थित केला सवाल
आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या
शरद पवार आपल्या खास मर्जीतील ‘या’ नेत्याकडे सोपवणार गृहमंत्रिपद?
मोठी बातमी! अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.