बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मागील सरकारच्या काळात फडणवीसांनी गाजर वाटपाचा कार्यक्रम केला- आदित्य ठाकरे

मुंबई | मुंबईतील विक्रोळीमधील संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्या 411 कुटुंबियांच्या नवीन घरांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लाभधारकांना घरांच्या चाव्यांचं वाटप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झालं आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मागील पाच वर्षात राज्यातील सरकार सांभाळणाऱ्या फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मागील सरकारने पाच वर्षात फक्त गाजर वाटपाचा कार्यक्रम केला आहे. मात्र, आम्ही तुम्हाला चावी वाटपाचा कार्यक्रम करत आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

देशात कितीही मोठे मोठे फटाके वाजत असले तरी, शिवसेनेचा आवाज कोणीच दाबू शकत नाही. देशातील पण वातावरण बदलायचं आहे. इतर पक्ष चावी मारण्याचं काम करत असतात. मात्र, आम्ही चावी वाटपाचे काम करत आहोत. तसेच, शब्द दिलेला असतो आणि तो पाळायचा असतो. शब्दाचे वाटप होऊ शकत नाही, असा चिमटा आदित्य ठाकरेंनी भाजपला घेतला.

दरम्यान, आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर फक्त आणि फक्त आपण स्वबळावरच सत्ता आणायची आहे. तसेच आपण महापालिकेवर भगवा फडकावणारच असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

भावाला अटक झाल्यानंतर शाहरूख खानच्या मुलीने घेतला हा मोठा निर्णय!

‘…म्हणून आजच्या कारवाया करण्यात आल्या’; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More