फडणवीसांचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यावर डोळा?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 2019च्या विधानसभा निवडणुकाचे निकाल लागले आणि महाराष्ट्रातले ( Maharashtra) राजकीय गणितं पुर्णच बदलले. 2019 प्रमाणेच अगदी काही महिन्यांपूर्वी पण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलपालथ झाली. आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं याची प्रचिती पुन्हा एकदा आली. शिवसेनेतलं बंड, महाराष्ट्रातलं सत्तांतर या घडामोडींदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी मात्र पुन्हा एकदा ते चतूर राजकारणी असल्याचं सिद्ध केलं.

यामुळे सहाजिकच महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा मास्टरमाईंड दुसरं तिसरं कोणी नसून देवेंद्र फडणवीसच असल्याची चर्चा सगळीकडे रंगली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर याच मास्टरमाईंड फडणवीसांच्या निशाण्यावर आता काँग्रेस आहे. फडणवीसांचा डोळा आता काँग्रेसच्या बड्या नेत्यावर आहे आणि इतकंच नाही पण फडणवीसांनी तशी खुली ऑफर दिल्यानं पण राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालीये.

महाराष्ट्रातल्या सत्तांतरामागं देवेंद्र फडणवीसांचंच (Devendra Fadnavis) मास्टरमाईंड असल्याचं विरोधत पण म्हणतात. सत्तांतरानंतर भाजपमध्ये मोठं इनकमिंग पाहायला मिळालं. यादरम्यानच काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, चव्हाणांनी या चर्चांचं खंडण केल्यानंतर आता काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे(Congress leader Satyajit Tambe) यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 7 डिसेंबर रोजी पार पडला. या पुस्तकप्रकाशन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat), काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर(Yashomati Thakur), क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनीपण हजेरी लावली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली पण अजित पवारांच्या अनुपस्थितीनं पण अनेकांचं लक्ष वेधलं.

या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सत्यजित तांबेंना भाजपात (BJP) येण्याची थेट ऑफरच दिलीये. सत्यजित तांबे यांना मी अनेक वर्षांपासून बघत आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजित मध्ये पाहायला मिळत असल्याचं फडणवीस म्हणाले. ‘बाळासाहेब, माझी एक तक्रार आहे. सत्यजीतसारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचाही डोळा त्यांच्यावर जातो. कारण चांगली माणसं जमाच करायची असतात, असं म्हणत फडणवीसांनी तांबेंना भाजपात येण्याची ऑफर दिली. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकलाच पण यामुळे राजकीय वर्तुळात मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

फडणवीसांच्या भाषणानंतर सत्यजित तांबे यांनीही भाषण केलं. फडणवीसांच्या ऑफरला सत्यजित तांबेंनीही सूचक प्रतिक्रिया दिलीये. सत्यजित तांबेंनी यावेळी बोलताना फडणवीसांचं भरभरून कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या लोकांची पारख असल्याची प्रतिक्रिया तांबेंनी दिली मात्र यामुळे आता अनेक उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय. काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष(Youth Congress President,), असा सत्यजित तांबेंचा राजकीय प्रवास आहे. नव्या पिढीचे राजकारणी म्हणून पण सत्यजित तांबेंकडे पाहिलं जातं. त्यामुळे सहाजिकच पुढेमागे सत्यजित तांबेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला तर याचा फायदा नक्कीच भाजपला होणारे.

महत्त्वाच्या बातम्या