Top News महाराष्ट्र सिंधुदुर्ग

फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला केराची टोपली, ठाकरे सरकारने पुन्हा ग्रामपंचायतीकडे ‘हे’ सोपवले अधिकार

सिंधुदुर्ग | फडणवीस सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलले अनेक निर्णय ठाकरे सरकारने बदलले आहेत. अशातच घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत.

फडणवीसांनी ग्रामपंचायतीकडून घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन टाऊन प्लानिंगकडे म्हणजेच जिल्हा स्तरावर दिले होते. त्यामुळे गावाकडे घर बांधणीच्यावेळी परवान्यासाठी नागरिकांना अडचणी येत होत्या.

ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाला विरोध दर्शविला होता. ठाकरे सरकारने याची दखल घेत हा निर्णय बदलला आहे. महाविकास आघा़डीने ग्रामपंचायतीकडे अधिकार दिले असून यासंदर्भात शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गा येथे घोषणा केली.

दरम्यान, ठाकरे सरकारने फडणवीस सरकारचे मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवणे, हायपरलूप प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेड सिग्नल दिल्यानंतर हा प्रकल्प गुंडाळल्यातच जमा असून शिक्षक बदलीतील धोरण बदलून पुन्हा एकदा जिल्हा परिषदकडे अधिकार देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवारांना धडा शिकवा, त्यांची सरकारमधून हकालपट्टी करा”

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

उद्यापासून अकारावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होणार!

काँग्रेस आमदाराला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर आरोप

“मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय पार्थ पवारांचाही सल्ला घ्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या