मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुन्हा जबाब नोंदवण्यात सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जबाब नोदंवण्यात आला आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेले पहायला मिळाले.
भीमा कोरेगाव हिंसाचाराला तत्कालीन राज्य सरकार जबाबदार असल्याचं शरद पवार यांनी आयोगासमोर सांगितलं आहे. भीमा कोरोगाव हिंसाचाराला भाजप सरकार जबाबदार होतं. हिंसा नियंत्रण करता आलं असतं पण तसं केलं गेलं नाही, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी फडणवीसांवर केला आहे.
सह्याद्री अतिथीगृहात निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात आली.
दरम्यान, भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी हा हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी केली होती.
थोडक्यात बातम्या –
“जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत….”; भाजप खासदाराचा गंभीर इशारा
मोठी बातमी ! तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा रुग्णालयात दाखल
‘कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना गंभीर इशारा
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा एका क्लिकवर
मोठी बातमी! आणखी एक सरकारी कंपनी विकण्याचा मोदी सरकारचा निर्णय
Comments are closed.