बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

मुंबई | राज्यात 2 ऑक्टोबरला मुंबईतील एका क्रुझवर एनसीबीनं कारवाई करत ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा केला होता. त्यानंतर या प्रकरणानं दररोज नवीन वळण घेतलेलं महाराष्ट्रानं पाहिलं आहे. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे आणि महाविकास आघाडी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. आता या प्रकरणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईवरून लक्ष विचलीत करण्यासाठी समीर वानखेडे यांना महाविकास आघाडीकडून लक्ष केलं जात असल्याचं फडणवीस म्हणाले होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ज्या अधिकाऱ्याची फडणवीस वकिली करत आहेत त्या अधिकाऱ्यानं अनेक संशयास्पद प्रकार केले आहेत. अशा खंडणीखोर अधिकाऱ्याची वकिली फडणवीस करत आहेत. त्यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचं अध:पतन मला बघवत नाही, असं राऊत म्हणाले आहेत.

समीर वानखेडे यांनी बोगस काम केलं आहे. रिया चक्रवर्तीला सुद्धा असंच अडकवण्यात आलं. तिच्यावर अजुन सुद्धा आरोपपत्र दाखल झालं नाही. ही सरळ सरळ खंडणीखोरी आहे हे आता स्पष्ट झालं आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सध्या महाविकास आघाडीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तर भाजप समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याच दिसून येतंय.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचं काम सुरू असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. परिणामी सध्या राज्यात आर्यन खान प्रकरणाची जोरदार चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या 

“मी आजही हिंदूच, आईची इच्छा होती म्हणून मी…”

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

पंजाबमध्ये राजकीय खळबळ; अमरिंदरसिंग यांनी केली महत्त्वाची घोषणा

भाजपला मोठा धक्का! भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More