Top News पुणे महाराष्ट्र राजकारण

भाजप-मनसे युती होणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

पुणे | राजकीय कट्ट्यावर रंगणाऱ्या भाजप-मनसे युतीच्या चर्चेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. पुण्यातल्या आढावा बैढकीत फडणवीसांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे स्पष्ट केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठरलेल्या अयोध्या दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलतील अशी चिन्हं होती. परंतू राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर राजकीय समिकरण बिघडले असल्याच्या चर्चा चालू झाल्या होत्या, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतही ही युती होईल की नाही, हे सध्यातरी स्पष्ट नाही.

आढावा बैठकीत फडणवीसांनी पुणे महापालिकेच्या निवडक कामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर अभय योजना, पीपीपी तत्वावरील प्रकल्प आणि ६ मीटर लांबीच्या रस्त्यांचे रूंदीकरण या महत्त्वाच्या निर्णयांचे स्वागत केले आहे. तर केलेल्या कामांबद्दल पदाधिकाऱ्यांचे देखील कौतुक केले आहे. अशा योजना भाजप सत्तेतील महापालिकेत राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश केल्याचा निर्णयावर फडणवीसांनी राज्य सरकारला चिमटे काढले. सोबत सर्व महापालिकेेने कामाचा वेग वाढवण्याचा सल्ला देखील फडणवीसांनी कारभाऱ्यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

एक नवरा, एक प्रियकर… आणखीही अनेकांसोबत संबंध, शेवट काळजाचा थरकाप उडवणारा

ती पुन्हा येतेय… जावा पुन्हा लॉन्च करतेय आपली खतरनाक बाईक!

‘हा’ आईपीओ मंगळवारी बाजारात धडकणार; गुंतवणुकदांरांसाठी मोठी संधी

अक्षय कुमारचं टेन्शन वाढलं, ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका

राज्य सरकारचा फ्लिपकार्टसोबत करार, तुम्हालाही होऊ शकतो फायदा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या