बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं”

मुंबई | दोन दिवसांपुर्वी मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. महाराष्ट्रातील 4 नेत्यांना केंद्रात मंत्रीपद दिलं गेलं. त्यात सर्वात चर्चा रंगलीय डाॅ. भागवत कराड यांच्या मंत्रीपदाची. मुंडे भगिनीना डावलून भागवत कराडांना मंत्रीपद दिल्यानं पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. या सर्व प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचं ‘राजकारणी डोकं’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या प्रकरणावर आता शिवसेनेने टीका केली आहे.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा मुंडे यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केलं. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याचं काम फडणवीसांनी केलंय, असा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. आजही भाजपने पंकजा मुंडेना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर फेकून दिलंय, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

येत्या निवडणूकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल. नारायण राणे मंत्री असताना देखील त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव राणेंनी घेतलाय, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, मी आणि प्रीतम नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. आम्ही कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी, आता ओबीसी चेहरा म्हणून भागवत कराडांना पुढं केलं जातंय का ?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार!

“पाकिस्तानात 58 रूपये लीटर पेट्रोल असताना भारतात 106 रूपये का ?”

“संजय राऊत तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?”

संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा, अन्यथा…- चित्रा वाघ

“काढ्या आणि योगामुळे देशात कोरोनाची लाट आटोक्यात आली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More