Top News राजकारण

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना फडणवीसांचा शिवसेनेला टोला; म्हणाले…

मुंबई | बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. दरम्यान बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत असताना फडणवीसांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला देखील लगावलाय.

फडणवीस त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन..”

याचसंदर्भात दुसरं ट्विट करताना, विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असं कॅप्शन देत बाळासाहेबांचा व्हिडीयो ट्विट केलाय. हे कॅप्शन देत त्या माध्यमातून फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सोनिया गांधींनी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांना निवडलं- बराक ओबामा

नितीश कुमार फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा त्यांना पिळून फेकून देईल; माजी मंत्र्याची टीका

भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का; ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक; प्रवीण दरेकरांची टीका

स्वर्गीय बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया- उपमुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या