नागपूर महाराष्ट्र

‘नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा’; देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना पत्र

नागपूर | सोशल मीडियावर सध्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी आणि भाजप नगरसेवक दयाशंकर यांना हनीट्रॅप करण्याबाबत गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवलं आहे.

अनिल देशमुख यांच्या आशीर्वादानेच गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था मॅनेज करण्याबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या ऑडिओ क्लिपची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

कथित ऑडिओ क्लिपमध्ये गंभीर उल्लेख असल्याने याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन त्यातील सत्य जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. याप्रकरणी आपण उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्याल, असा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलंय.

दरम्यान, या कथित ऑडिओक्लिप प्रकरणी लवकरात लवकर चौकशी केली जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात जाणाऱ्या मार्गावर ‘या’ तीन ठिकाणी 24 तास होणार कडक तपासणी

वारी साधेपणाने झाली, बकरी ईदही साधेपणाने करु- उद्धव ठाकरे

’26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री…’; सचिन पायलट यांना कमी वयात काँग्रेसने अनेक जबाबदाऱ्या दिल्या

गणपतीसाठी कोकणात जाता येणार का?; आढावा बैठकीनंतर अनिल परब यांनी केली मोठी घोषणा

लाल किल्ल्यावर यंदा कोरोनामुक्त योध्यांना निमंत्रण, विध्यार्थी, VVIP नसणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या