‘दादा तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक’; फडणवीसांचं अजित पवारांना उत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी ‘पुरेशी तरतूद’ म्हणजे काय ते स्पष्ट करावं. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांच्या प्रश्नावर उत्तर दिलंय.

दादा तुम्ही म्हणालात पुरेशी तरतूद काय म्हणजे काय ते समजलं नाही. पण दादा हा केवळ तुमच्या आणि माझ्या भाषेतला फरक आहे. तुम्ही जरा कडक आहात त्यामुळे तुम्ही आवश्यक तरतूद असा शब्द वापरता. तुमचे याआधीचे अर्थसंकल्प पाहा, असं फडणवीस (Fadnavis) म्हणालेत.

तुम्ही ‘आवश्यक’ असा शब्द लिहिलात आणि मी स्वभावाने थोडा मृदू असल्याने मी ‘पुरेशी तरतूद’ असा शब्द लिहिला. एवढाच फरक आहे, असं ते म्हणालेत.

अजित पावर यांनी मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी वाचून दाखवल्या. त्यात आवश्यक तरदूद असा शब्द सातत्याने आला असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-