बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात ईडीच्या मार्फत सत्तांतर करण्याचा डाव???; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

चंद्रपूर |  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर गेल्या आठवड्यात ईडीच्या धाडी पडल्या. त्यानंतर आता भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी व्हावी याबाबत गृहमंत्री अमित देशमुखांना पत्र लिहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांच्या मागे ईडीची पीडा लावत महाराष्ट्रात सत्तांतर करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपवर केला जातो. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडवण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस आपल्या मूळ गावी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी त्यांनी जाताना माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकारच उरला नसल्याचं आम्ही वारंवार सांगत होतो. तरीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

कारवाई होताच अजित पवार म्हणाले…

‘अजितदादा आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी…’; नवाब मलिकांचा भाजपवर गंभीर आरप

“ईडी, सीबीआयचा वापर हा तर पाठीतला वार, ही महाराष्ट्राची परंपरा नाही”

तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर…- जयंत पाटील

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More