Top News महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची फडणवीसांनी गंभीर दखल घेत ‘त्या’ ऑडिओ क्लिप डीजींकडे पाठवल्या

मुंबई | बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथची रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरूणीने रोज डेला पुण्यात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. या तरूणीच्या आत्महत्येला ठाकरे सरकार असलेल्या विदर्भातील एका मंत्र्याचं नाव जोडलं जात आहे. अशातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

बीड जिल्ह्यातील युवती पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणी तसेच या प्रकरणात समाजमाध्यमांत व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्सच्या अनुषंगाने सर्वंकष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं असून त्यामध्ये व्हायरल झालेल्या क्लिपही त्यांनी पोलीस महासंचालकांना पाठवल्या आहेत.

स्व. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणातील काही व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 व्हिडीओ क्लिप माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. संवादाचा नेमका अर्थ काय त्यातून स्व. पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचं खेदानं नमूद करावंसं वाटत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची अतिशय सखोल आणि सर्वकष चौकशी होणे नितांत गरजेचं आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीसांनी पत्रात केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल!

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, अन् तुम्ही मला…- अजित पवार

‘दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल

मुख्यमंत्री महोदय, सर्व पुरावे असतांना वाट कसली पाहताय- चित्रा वाघ

“राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे, एका हाताने टाळी वाजत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या