बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फडणवीस RSSच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत’; काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई | मागील काही दिवसांपुर्वी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेट घेताना दिसत आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका देखील घेतली आहे. यासाठी राज्यव्यापी आंदोलन देखील केलं होतं. याच प्रकरणात भाजपने ठाकरे सरकारचा घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता काँग्रेसने भाजपवर निशाण्यावर घेतलं आहे.

फडणवीस आरएसएस या त्यांच्या मातृसंस्थेच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत आणि त्याचे पहिले बळी हे मराठा आणि ओबीसी समाज ठरले आहेत. त्यामुळे भाजपने आता आंदोलनाची नाटकं थांबवावी कारण आरक्षण संपवण्यासाठी भाजपने रचलेले षडयंत्र पुराव्यानिशी जनतेच्या समोर आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

जर एससी एसटीचं आरक्षण 50 टक्केच्यावर जात असेल तर त्या आरक्षणात कपात करून आरक्षण 50 टक्केच्या आत ठेवावं, असा अध्यादेश 31 जुलै 2019 रोजी फडणवीस सरकारने काढला होता. त्याचा पहिला फटका ओबीसीच्या आरक्षणाला बसला आहे. फडणवीस सरकारने आणि पंकजा मुंडे यांनी केंद्राला जातीच्या आकडेवारीसाठी पत्र लिहिलं होतं, मात्र त्यांचे पत्र केंद्रातल्या भाजप सरकारकडून फेटाळण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूकीपासून हा प्रकार सुरू झाला होता. ही निवडणूक हारण्याच्या शक्यता असल्यानं त्यांनी निवडणूका पुढे ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. तर सर्वोच्च न्यायालयात देखील फडणवीस सरकारने कोणत्याही प्रकारचा डेटा न दिल्यानं ही परिस्थिती नाकारली उद्भवली आहे. खोटं बोलून आएसएसच्या विचारधारेप्रमाणे बहुजन जनतेला पुन्हा गुलाम करण्याचा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठमोळ्या राहीनं पटकावलं गोल्ड मेडल; देशाला पहिलं सुवर्णपदक

पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; ‘या’ वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई 

“डबल इंजिन सरकारने बिहारमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 100 रुपये लिटर पेट्रोल केल्याबद्दल अभिनंदन”

होय, मी भक्त आहे आणि मला अभिमान आहे – अमृता फडणवीस

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More