Mahayuti | महाराष्ट्रात महायुती सत्तेत विराजमान होणार आहे. बहुमतानंतर देखील सत्तास्थापनेचा पेच मात्र कायम होता. सत्तेत अपेक्षित स्थान मिळणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गृहखात्यावरूनही महायुतीत कलगीतुरा सुरु असल्याचं सर्वांनी पाहिलं. मात्र शिंदेंनी मी नाराज नल्याचं सांगितलं. असं असलं तरी शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं शिवसेना नेत्यांनी बोलून दाखवलं होतं. आता भाजप शिवसेनेला गृहमंत्रीपद देणार नसल्याचे संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
फडणवीसांचा शिंदेंना धक्का?
विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच भाषण केलं. या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय.
येत्या काळात चार गोष्टी मनासारख्या होतील. तर चार गोष्टी मनाविरुद्धही होतील. लार्जर इंट्रेस्टमध्ये काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ. एवढा मोठा कौल असल्यावर सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
Mahayuti | राजकारणात काहीतरी मोठं घडणार का?
देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सूचक विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा पार पडेल. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. शपथविधी फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व प्रात्प झालं आहे. तसेच शिवसेनेची मागणी मान्य होणार नाही, असे स्पष्ट संकेतच फडणवीसांनी दिलेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ते पुन्हा आले….; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगारही मिळणार भरभक्कम; ‘इथे’ करा अर्ज!
विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय
आता केवळ ‘या’ पात्र महिलांनाच मिळणार लाडक्या बहिण योजनेचा लाभ; काय आहेत अटी?