बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीसांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे ते दाखवून द्यावं”; जयंत पाटलांचा पलटवार

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच लसीकरणादरम्यान राज्यात फक्त 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसीकरणाचा साठा उपलब्ध आहे असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती केली.

त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय टीकाटिप्पणीला सुरुवात झाली. फडणवीसांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आणि महाराष्ट्रात 15 लाख लसींचा साठा असताना लसीकरण मोहीम का थांबवली? असा प्रश्नही विचारला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. पण दुर्दैवाने लस कमी पडत आहेत, असं म्हणत जयंत पाटील यांनी ‘विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा सर्वाधिक साठा आहे ते दाखवून द्यावं, आम्ही आमच्याच राज्याच्या लोकांना कसं घाबरवू?’ असं प्रत्युत्तर दिलं आहे.

जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना म्हटले आहे की, ‘देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांनी दिल्लीच्या बाजूने न बोलता महाराष्ट्राच्या बाजूने बोललं पाहिजे’, तसेच लसींची मागणी जर देवेंद्र फडणवीस यांनी केली असती तर बरं झालं असतं, असंही यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

“जाणीवपूर्वक लसीकरण बंद करून, लसींच्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय?”

‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी’; नाना पटोले आक्रमक

प्रकाश जावडेकरांचा पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More