राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘त्या’ भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत, म्हणाले…
मुंबई | नाणार प्रकल्पाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं होतं. यात त्यांनी नाणार सारखा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून जाणं योग्य नाही त्यामुळे सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असं आव्हान केलं होतं. यावर देेवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांंसमोर भूमिका स्पष्ट केली आहे.
मला राज ठाकरेंचं पत्र मिळालं आहे. मी त्यांच्या पत्राचं स्वागत करतो. त्यांनी अतिशय योग्य भूमिका या ठिकाणी भूमिका घेतली आहे. त्यांनी पत्रातही उल्लेख केला आहे, डॉ अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सगळ्या शंका संपल्या आहेत. कोकणाच्या विकासाकरीता नाणार येथेच रिफायनरी करणं हे अत्यंत योग्य असेल तर, त्याला पाठिंबाच नाही तर ब्लु प्रिंट करायला ते मदत करणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
आम्ही हेच सांगत होतो की कोकण विकासाचा टप्पा या नाणार रिफायनरीमुळे होणार आहे. ही ग्रीन रिफायनरी आहे. पर्यावरणाच्या बाबतीत ज्या शंका उपस्थित केल्या आहेत. त्या चुकीच्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होणार आहे. आर्थिक ऑक्टिव्हीटी वाढल्याशिवाय पर्यटन वाढू शकत नाही. हजारो लोकांना थेट तर लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धवजींनी देखील डॉ अनिल काकोडकर यांच्यासारख्या तज्ञांकडून समजून घ्यावं आणि त्याला पाठिंबा द्यावा असं आमचं स्पष्ट मत आहे. याला निवडणुकीचा रंग देऊ नये, असा सल्ला फडणवीसांनी दिला.
थोडक्यात बातम्या-
‘…म्हणून महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’; केंद्रीय पथकाने सांगितलं कारण
नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, म्हणतात…
‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे…’; जयंत पाटलांसाठी समर्थकांनी शेअर केला व्हिडिओ
कोरोना लसीत गाय आणि डुकराची चरबी, आमचा धर्म भ्रष्ट होईल”
सावळ्या रंगाच्या त्रासाला कंटाळून तरूणाने उचललं हे धक्कादायक पाऊल
Comments are closed.