नागपूर महाराष्ट्र

…तेव्हा गप्प का?, पडळकरांवरुन राष्ट्रवादी राजकारण करत आहे- देवेंद्र फडणवीस

नागपूर | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं कधीच समर्थन नाही. पण राष्ट्रवादीचे नेते यावरून राजकारण करत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचं बोलत होते तेव्हा गप्प का?, असा सवाल करत विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते अमरावतीतील क्वारंटाईन सेंटरची पाहणी करत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

राज्य सरकारने कर वाढवल्याने तीन रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल दरवाढीवरुन काँग्रेसचं जे आंदोलन सुरु आहे ते बेगडी आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्य सरकारने आपले कर कमी केल्यास पेट्रोलचे दर काही प्रमाणात कमी होतील. तसेच अनलॉक 2 मध्ये गोंधळ आहे. मुख्यमंत्र्यांनी काय लॉक आणि काय अनलॉक हे स्पष्ट करावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली; एक्स्प्रेस वेवर अपघात

काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको- मायावती

विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

धक्कादायक! भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या