बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिल्व्हर ओकवर फडणवीस-पवार भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

मुंबई | भाजपचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. याची माहिती फडणवीस यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं आहे. या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस थेट शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. तर फडणवीस शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असं सांगण्यात आलं आहे.

शरद पवार यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी ठीक नव्हती. त्यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाचा त्रास झाला होता. त्यामुळं त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार चालू असताना शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर आज ही भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अजूनतरी समोर येऊ शकला नाही.

दरम्यान, मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणावर राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले होते. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही 100 कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष चांगलेच आक्रमक झालेले दिसले.

 

थोडक्यात बातम्या –

राज्य सरकारनं उचललं मोठं पाऊल; पुण्यात ‘एवढ्या’ टन ऑक्सीजनची निर्मिती होणार

मोठी बातमी! मराठा समाजाला मिळणार आरक्षणाचा लाभ; राज्य सरकारची मोठी घोषणा

भांडत भांडत बालकनीपर्यंत आले नवरा-बायको अन्…; थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ओबीसींसाठी सध्या राज्यात कोणतंच आरक्षण उरलं नाही- देवेंद्र फडणवीस

प्रेयसीला सासरी जाताना बघू शकला नाही; प्रियकराने रस्त्यात अडवून जे केलं त्याने सगळे हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More