बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीसांची मोठी खेळी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारचं रिमोट देवेंद्र फडणवीसांकडे?

मुंबई | 10 दिवसांच्या सत्तानाट्याच्या दुसऱ्या अंकात नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक मास्टरस्ट्रोक लगावला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील (Maharashtra New CM Eknath Shinde). देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे. मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस नसणार मात्र, राज्यातील या नव्या सरकारचा रिमोट त्यांच्या हातात असणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे मंत्रिमंडळावर असलेले वर्चस्व आणि देवेंद्र यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव याआधारे राज्य सरकारचा रिमोट त्यांच्या हाती असणार आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर, मुद्यांवर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

देवेंद्र फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला- एकनाथ शिंदे

पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार

फडणवीस आणि शिंदेंच्या शपथविधीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!

“महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More