बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आमचा उमेदवार हरला तरी आम्हाला पर्वा नाही’; जि.प. पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून 14 दिवसांचं अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र राज्य सरकारने फक्त दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या 200 जागांसाठीच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात मतदान होणार आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

निवडणुकांच्या विरोधात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत. पण तरीही या सरकारचा जर निवडणुका लढवण्याचा डावच असेल तर भाजप या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नसल्याचं देेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या निवडणुकांवरून फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आम्ही या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजून ओबीसी उमेदवार लढवू. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजप शांत बसणार नसल्याचं म्हणत फडणवीसांनी देेवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे.

दरम्यान, माझं आव्हान आहे, सरकारमधील ओबीसीच्या मंत्र्यांना आव्हान आहे, राज्य सरकारला अधिकार आहे, या मंत्र्यांनी राज्य सरकारला निवडणुका पुढे घ्यायला भाग पाडा, असंही फडणवीस म्हणाले. यावर सरकारकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

सलाम कोल्हापूरांना! कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी केला हा खास उपक्रम

आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी! मानधनात वाढ आणि कोविड भत्ताही मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा म्हणत परिचारिकांचं आंदोलन!

“सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं”

“केंद्रातील मोदी सरकार घालवल्याशिवाय देशातील शेतकऱ्यांसह, कष्टकऱ्यांचे अच्छे दिन येणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More