बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!

मुंबई | मनसुक हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून सचिन वाझे यांच निलंबन करण्यात यावं, अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून विरोधीपक्षाकडून केली जात आहे. तर काल गृहमंत्री अनिल देशमुखांनी अन्वय नाईक प्रकरणावरून एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून अनिल देशमुख यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्ताव सभागृहात दाखल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. याला उत्तर देत सर्वोच्च न्यायालयाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. ही हत्या नसून आत्महत्या आहे असं कोर्टाने स्पष्ट केलं होतं, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.

मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहात देखील सांगितला. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना देखील न्यायालयाचा अवमान करणारं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. गृहमंत्री माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, विरोधकांना बोलू दिलं जात नाही. इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण यांच्याविरूद्ध देखील हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

पाहा व्हिडिओ-

थोडक्यात बातम्या-

दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून 60 वर्षांचे आजोबा चढले विजेच्या खांबावर, अन्…

भर रस्त्यात माथेफिरुचा चौघांवर चाकू हल्ला; एका व्यक्तीचा मृत्यु, तीन जण गंभीर जखमी

सचिन वाझेंची उचलबांगडी होणार; अनिल देशमुखांनी केली मोठी घोषणा

विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये- संजय राऊत

सॉरी, तुला खूप त्रास दिला…’; नेटकऱ्यांनी मागितली रिया चक्रवर्तीची माफी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More