बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या पत्नी आणि मुलीलाही…”; पुतण्याच्या लसीकरणाच्या फोटोवर फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना वाढत असताना ऑक्सिजन आणि बेडची कमतरता या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासोबतच लसींचा तुटवडाही जाणवत आहे. यावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षला धारेवर धरलं आहे. मात्र अशातच विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने म्हणजेच तन्मय फडणवीसने कोरोनाची लस घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षावरील लोकांना लस मिळत आहे. मात्र तन्मय फडणवीस हा 45 वर्षाचा नसतानाही त्याला लस कशी काय देण्यात आली?, असा प्रश्न करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लसीकरणासाठी पात्र नसल्यामुळे माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळाली नाही. त्यामुळे प्रत्येकानं नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

दरम्यान,तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्येलसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र त्यानंतर त्याने हा फोटो डीलिट केला.

 

थोडक्यात बातम्या- 

तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, कुटुंबातील 7 जणांवर केले कुऱ्हाडीने वार

पुण्यातील धक्कादायक घटना, अंत्यसंस्काराला तोबा गर्दी, मृताचे पाय धुवून पाणीही पिलं!

15 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

‘जय श्री राम’ घोषणा न दिल्यानं 10 वर्षाच्या चिमुरड्याला मारहाण; भाजप कार्यकर्त्याचं अमानुष कृत्य

कोरोनाच्या संकटात आपल्या जिल्ह्यासाठी नाना पटोले यांची मोठी मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More