बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्युलिओ रिबेरोंच्या टिप्पणीवर फडणवीसांचं ओपन लेटर; म्हणाले, “माझ्या हातून….”

मुंबई | भाजपचे नेते पुन्हा सत्तेत येण्यासाठी राजकारण करत आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नको त्या चुका केल्याची टिप्पणी माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी नुकत्याच एका लेखातून केली आहे. या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनीही लेख लिहूनच प्रत्युत्तर दिलं आहे. या लेखात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे.

माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाबद्दल आपण कौतूक केलं, त्याबद्दल आभार, तुमचे हे शब्द मला भविष्यात प्रेरणा देत राहतील. तुमचा स्पष्टवक्तेपणा आणि वचबद्धतेनं नेहमीच मला प्रभावित केलं आहे. मी तुमच्या लेखात व्यक्त केलेल्या मतांचा प्रतिकार करण्यासाठी हे पत्र लिहित नाही. कारण आपल्यात काही मतांतर असू शकतं. पण प्रत्येक टीका ही मी रचनात्मक पद्धतीने घेतो. पण महाविकास आघाडीनं चुकीच्या गोष्टी पसरवल्या असून जो चुकीचा प्रचार केला आहे त्याबाबत मी तथ्य समोर आणण्यासाठी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी, केवळ या हेतूनं मी हा लेख लिहित आहे.

‘मी किंवा प्रवीण दरेकर यापैकी कुणीही रेमडेसिवीर भाजपासाठी खरेदी करणार नव्हतो. एफडीए मंत्र्यांना आधीच दिलेले पत्र हे स्वयंस्पष्ट आहे की, आम्ही केवळ समन्वय घडवून आणत आहोत आणि एफडीएनेच ते खरेदी करायचं आहेत. यात काही अडचणी प्रशासकीय पातळीवर येणार असतील, तर ते आम्ही खरेदी करतो आणि सरकारला देतो, असाही प्रस्ताव दिला. दरेकर यांनी त्या उत्पादक कंपनीसोबत एफडीए मंत्र्यांसोबत संवादही घडवून आणला. यानंतरच एफडीएने अधिकृत पत्र या कंपनीला दिलं. त्यामुळं या साठ्याचा पुरवठा महाराष्ट्र सरकारलाच करण्यास सांगण्यात आलं होतं. तर, स्वत: एफडीए मंत्र्यांनी एका मुलाखतीत हा साठा राज्य सरकारसाठी होता, हे स्पष्ट केलेलं आहे’.

‘मी डीसीपी ऑफिसला का गेलो?, कंपनीच्या एका संचालकाला मंत्र्याच्या ओएसडीने फोन करुन विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन तुम्ही रेमडेसिविर का देत आहात अशी विचारणा केली. तुम्ही फक्त सरकारच्या सांगण्यावरुन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपण सरकारलाच रेमडेसिविर देत असून यासंबंधी एफडीए मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली. त्याचदिवशी संध्याकाळी एक एपीआय ट्रॅप करण्यासाठी सिव्हील ड्रेसमध्ये पोहोचले आणि त्यांनी रेमडेसिवीर मागितले. मात्र, सदर कंपनीनं त्याला ते देण्यास ठाम नकार दिला. हा ट्रॅप फसल्यानंतर रात्री 8 ते 10 पोलिस त्यांच्या घरी गेले. त्यांनी त्यांचा फोन तपासला आणि त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर दरेकर यांनी मला माहिती दिली की काहीतरी गौडबंगाल आहे’, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

गर्भवती महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने धडपड करणाऱ्या डाॅक्टरांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

“तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन व्हा, उपाध्यक्ष होऊ शकता अट एकच…”, नेटकऱ्याच्या ट्विटकर अमृता फडणवीस भडकल्या

धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील कृत्यानं महाराष्ट्र हादरला एकाच रुग्णवाहिकेत कोंबले ‘इतक्या’ रुग्णांचे मृतदेह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची बदनामी सहन केली जाणार नाही- संजय राऊत

नागरिकांना यावर्षीही बसणार वाढीव वीजबिलाचा फटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More