बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला आहे. महाविकास आघाडी सरकारला पंढरपूरच्या निकालानं धक्का बसला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय.

मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता कोरोनाशी लढायचं आहे. ही वेळ नाही. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळवलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आम्हाला पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो. या सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. बारा बलुतेदारात नाराजी होती, वीज तोडली गेली त्यावरुन जनता नाराज होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे”

“अवताडेंचा विजय आघाडी सरकारच्या थोबाडीत मारल्यासारखा, फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात”

कसा झाला समाधान आवताडे यांचा विजय?, पाहा कशी कशी मिळाली मतं

“संज्या, तू स्वत: कधी निवडून येणार ते आधी सांग”

“तुम्ही फक्त जामिनावर सुटलात, जोरात बोलू नका नाहीतर महागात पडेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More