‘या’ नंबरपासून येणारे कॉल उचलू नका; अन्यथा खाली होईल बँक अकाऊंट

Fake Call Alert | सायबर क्राइम करणारे आता जागोजागी दिसून येतात. सध्या जवळपास सर्वच व्यवहार हे ऑनलाइन झाले आहेत. काहीही खरेदी करताना ओटीपी देणं बंधनकारक झालंय. मात्र, यातही तुमची फसवणूक होऊ शकते. इतकंच काय, तर काही फोन कॉल्स सुद्धा तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतात. अशा कॉलपासून नेहमी सावध राहायला हवं.

Jio Airtel आणि वोडाफोनने त्यांच्या ग्राहकांना बनावट कॉल्स विरुद्ध चेतावणी दिली आहे. दूरसंचार ऑपरेटर्सने सांगितले की, काही स्कॅमर लोकांना डिस्कनेक्ट करण्यासाठी बनावट कॉल करत आहेत. DoT (Department of Telecommunication) ने नागरिकांना याबाबत सतर्क केलं आहे.

तुम्हाला आलेला कॉल हा फेक आहे की नाही, याबाबत ओळख करणे यासोबतच त्याची तक्रार देण्या इतपत माहिती DoT ने दिली आहे. याद्वारे ग्राहक स्वतःची फसवणूक टाळू शकतात. या लेखात या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘इथे’ करा तक्रार

DoT ने सांगितले की, ग्राहक www.cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक 1930 द्वारे आर्थिक फसवणुकीची तक्रार करू शकतात. इथे तुमची समस्या समजून त्यावर लगेच तपास केला जाईल.

दूरसंचार विभागाने नागरिकांना त्यांचे मोबाईल कनेक्शन (Fake Call Alert ) तोडण्याची धमकी देणाऱ्या बनावट कॉल्सपासून सावध केले आहे. दूरसंचार विभागाने यापूर्वी परदेशी मोबाइल नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल्सबद्दल एक सल्ला जारी केला होता, जे +92 इत्यादी कोडसह सुरू होते. याद्वारे सरकारी अधिकारी असल्याची माहिती सांगून लोकांची फसवणूक केली जात होती.

‘मोबाइल नंबर बंद होईल’असं सांगून फसवणूक

सायबर गुन्हे/आर्थिक फसवणूक करण्याची धमकी देण्यासाठी अशा कॉलद्वारे वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे दूरसंचार विभागाने अजून एक निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटले आहे की DoT/TRAI कोणालाही त्यांच्या वतीने असे कॉल करत नाही. ग्राहकांसोबत अशी फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार करावी.

दूरसंचार विभागाने 700 एसएमएस कंटेंट टेम्प्लेट्स (Fake Call Alert ) सायबर गुन्ह्यांशी निगडीत असल्याचे आढळल्यानंतर ते ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहेत. यासोबतच 10,834 संशयास्पद मोबाईल नंबर दूरसंचार ऑपरेटर्सना पुन्हा पडताळणीसाठी देण्यात आले आहेत. त्यापैकी 8272 मोबाईल कनेक्शन 30 एप्रिल 2024 पर्यंत बंद करण्यात आले.

News Title-  Fake Call Alert Indian Govt Warns

महत्त्वाच्या बातम्या –

घटस्फोटानंतर ईशा देओलची पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात; म्हणाली..

शेतकऱ्यांसोबत पावसाची थट्टा; ‘या’ भागांना अवकाळीचा फटका बसणार

ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या दर

बापरे! 72 तासांत 8 किलो सोने, 14 कोटी रोकडसह 170 कोटींची मालमत्ता जप्त; कोण आहे मालक

मोदींपेक्षाही कंगना रनौत श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून हैराण व्हाल