बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पैसे द्या अन् पदवी घ्या! पदव्या विकण्याचा गोरखधंदा जोमात

अहमदनगर | अगदी काही हजारांपासून ते एक ते दोन लाख रुपये द्या आणि पदवी घेऊन जा, असा गोरखधंदाच काही संस्थांनी थाटला आहे. नगर जिल्ह्यात सुरु असलेला हा धंदा विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहे आणि विद्येसारख्या पवित्र गोष्टीला बदनाम करत आहे. फसवणूक होण्याचा धोका असतानाही अनेकजण या आकर्षक जाहीरातींना बळी पडत आहेत.

भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यवसाय प्रबंधन अध्यायन संस्थान या नावाने अहमदनगर येथे पैसे घेऊन बनावट पदव्या विक्रीचा धंदा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधीतांवर गुन्हा दाखल केला असून हा धंदा किती फोफावला आहे याचा अंदाज येतो. शहरात यापुर्वीही असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करुन ते बंद पडले आहेत.

इंजिनिअरींग, बी. टेक., एम. टेक. पासून अगदी डॉक्टरेटच्या पदव्या देखील मिळतील, अशा प्रकारच्या जाहीराती सोशल मिडीयावर केल्या जातात. आळशी आणि झटपट पदवीधर होण्याची स्वप्ने पहाणारे विद्यार्थी अशा लोकांना बळी पडतात आणि लाखो रुपये खर्च करुन पदवी मिळवितात. या पदव्या बोगस असतात. या संस्थांची युजीसी किंवा एआयसीटी कडे नोंदणी नसते त्यामुळे त्या अनधिकृत असतात.

बोगस पदव्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत उच्च शिक्षण संचलनालयाने यापुर्वीच परिपत्रके काढून पैसे घेऊन पदव्या देणाऱ्या संस्था माहित असल्यास विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण संचलनालयाच्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन केले आहे. कोणत्याही संस्थेत प्रवेश घेताना त्या संस्थेची शासकीय मान्यतेच्या कागदपत्रांची पडताळणी करावी, संपुर्ण माहिती घ्यावी असे काही निर्देश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

‘आम्हाला डुकरं म्हणतात आणि आमच्याच मतांवर राज्यसभेत निवडून जातात’,गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

“मागच्या मुख्यमंत्र्यांनी नाक्यावरची भाषणं आणि टोमणे मारण्यापलीकडे काही केलं नाही”

लोकल प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच ‘ही’ सुविधा मिळणार

पाणी कपातीमुळे वाढणार डेंग्यूचा ताप, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More